solapur: सोलापूरात दोन गटात तलवारीने हाणामारी, २० जणांवर गुन्हा दाखल

0

सोलापूर,दि.१७: माती घेण्याच्या किरकोळ कारणावरून सोलापूरातील (solapur) रमाबाई आंबेडकर नगरात दोन गटात तलवारीने तुफान हाणामारी होऊन दोन्ही गटातील अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुध्द तक्रारी दिल्या असून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

श्रीशैल गुंडू बनसोडे ( रा. आम्रपाली चौक, न्यू बुधवार पेठ ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजित गादेकर, विजय गादेकर, अमोल शिंदे, संजय बनसोडे, सुनील शिवशरण, आकाश शिंदे, संजय बनसोडे, रोहन गायकवाड व दोन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जुना बस डेपो येथे माती घेण्यासाठी गेले असताना अजित गादेकर यांनी तू येथे जेसीबी कशासाठी आणला आहे. माती कशाला घेऊन जात आहे. या कारणावरून डोक्यावर तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले.

तर अजित गादेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीशेल बनसोडे, परमेश्वर बनसोडे, मल्लिनाथ बनसोडे, गुद्रु बनसोडे, बाळासाहेब लोखंडे, आर्थेश लोखंडे, अजय मस्के, विकी मस्के, यल्सादास वामने, छोटू अशा १० जणांवर गुन्हा दाखल झाला.

माती उकरण्याच्या कारणावरून श्रीशेल बनसोडे याने हटकले असता, मागील वेळेस तू वाचला आहेस आता जर तू आडवा आला तर तुला वामनेदादांनी जीवे मारण्यास सांगितले आहे, असे म्हणून आणलेली तलवार फिरवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here