Solapur Temperature Today | सोलापुरात आजचा दिवस ठरला सर्वाधिक तापमानचा दिवस 

0
Solapur Temperature

सोलापूर,दि.२: Solapur Temperature Today | सोलापूर (Solapur) शहर व परिसरात शुक्रवारचा दिवस यंदाचा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. तापमान तब्बल ४४.७ अंश सेल्सिअस इतके वाढल्याने सोलापूरकरांची अक्षरशः होरपळ झाली. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सोलापूरकर चांगलेच हैराण झाले आहेत. 

शुक्रवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवली. दुपारनंतर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे नेहमी गजबजलेले रस्ते अक्षरशः निर्मनुष्य दिसून आले. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी घरी राहणेच पसंत केले. ज्यांना अत्यावश्यक कामे करायची होती, त्यांनी मात्र घराबाहेर पडताना टोपी, हातरुमाल, गमजे, छत्र्या, स्कार्फ आदींचा आधार घेतला.

Solapur Temperature Today

मे महिना उजाडताच सोलापूरसह राज्यातील तापमानाचा पारा देखील उंचावला आहे. राज्यातील उन्हाची दाहकता वाढतच असून आज (शुक्रवार) सोलापूरसह राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. गेल्या ६ एप्रिलपासून सोलापूरचे तापमान ४० अंशाच्या वरच आहे. २७ एप्रिल रोजी ४०.० अंश सेल्सिअस तर २८ एप्रिल रोजी ४१.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

Solapur Temperature Today | सर्वाधिक तापमानचा दिवस 

२९ एप्रिल रोजी ४२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर ३० एप्रिल रोजी ४३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. काल ४४.१ अंश सेल्सिअस तापमान होते तर आज (२ मे) यंदाचा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. तापमान तब्बल ४४.७ अंश सेल्सिअस इतके वाढल्याने सोलापूरकरांची अक्षरशः होरपळ झाली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here