सोलापूर,दि.१: Solapur Temperature | सोलापूर (Solapur) शहर व परिसरात गुरूवारचा दिवस यंदाचा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. तापमान तब्बल ४४.१ अंश सेल्सिअस इतके वाढल्याने सोलापूरकरांची अक्षरशः होरपळ झाली. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सोलापूरकर चांगलेच हैराण झाले आहेत. (Solapur Temperature Today)
मे महिन्याचा पहिलादिवस उजाडताच सोलापूरसह राज्यातील तापमानाचा पारा देखील उंचावला आहे. राज्यातील उन्हाची दाहकता वाढतच असून आज (गुरूवारी) सोलापूरसह राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. गेल्या ६ एप्रिलपासून सोलापूरचे तापमान ४० अंशाच्या वरच आहे. २७ एप्रिल रोजी ४०.० अंश सेल्सिअस तर २८ एप्रिल रोजी ४१.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

Solapur Temperature | सर्वाधिक तापमानचा दिवस
२९ एप्रिल रोजी ४२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर काल ३० एप्रिल रोजी ४३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर आज (१ मे) यंदाचा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. तापमान तब्बल ४४.१ अंश सेल्सिअस इतके वाढल्याने सोलापूरकरांची अक्षरशः होरपळ झाली.
गुरूवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवली. दुपारनंतर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे नेहमी गजबजलेले रस्ते अक्षरशः निर्मनुष्य दिसून आले. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी घरी राहणेच पसंत केले. ज्यांना अत्यावश्यक कामे करायची होती, त्यांनी मात्र घराबाहेर पडताना टोपी, हातरुमाल, गमजे, छत्र्या, स्कार्फ आदींचा आधार घेतला.