धर्मराज काडादी यांनी कायम ठेवला उमेदवारी अर्ज तर…

0

सोलापूर,दि.4: माजी आमदार दिलीप माने यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. माने यांनी धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. अशी माहिती समोर येत आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. धर्मराज काडादी यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (UBT) अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अर्ज माघार घेण्यासाठी आज 4 नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती. दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता दक्षिण विधानसभा मतदारसंघात धर्मराज काडादी आणि भाजपाचे सुभाष देशमुख यांच्यात लढत होणार आहे. 

भाजपा नेत्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी (Shobha Tai Banshetti) मोठा निर्णय घेतला आहे. शोभाताई यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. 

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात विजयकुमार देशमुख आणि महेश कोठे यांच्यात लढत होणार आहे. अशातच शोभाताई बनशेट्टी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे आता विजयकुमार देशमुख यांना मोठा धक्का बसणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here