सोलापूर,दि.6: Solapur: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 तारखेला निकाल लागणार आहेत. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी, भाजपचे आमदार सुभाष देशमुख व शिवसेनेचे (ठाकरे गट) अमर पाटील यांच्यात लढत होणार आहे. मात्र सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार बदल करण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहेत. बदल हवा, चेहरा नवा, दक्षिण सोलापूरमध्ये धर्मराज काडादी यांचीच हवा ! अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मतदारांकडून येत आहेत.
धर्मराज काडादी यांनी अनेक संस्थांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यात प्रामुख्याने श्री सिध्देश्वर सहकारी कारखाना, श्री सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल, संगमेश्वर कॉलेज, श्री सिध्देश्वर वुमेन्स पॅालिटेक्निक आणि इतर संस्थांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. याचा फायदा काडादी यांना होईल असे दिसत आहे.
काडादी यांच्यामागे ‘माजी आमदार दिलीप माने’ यांची ताकद असणार आहे. काडादी यांच्यामागे ‘बाळासाहेब शेळके’ यांची ताकद असणार आहे. श्री सिध्देश्वर परिवाराचे मोठे मतदान या मतदारसंघात आहे. तसेच सुरेश हसापुरे, गुरूसिध्द म्हेत्रे यांची मोठी मदत काडादी यांना होणार आहे. यामुळेच येथील मतदार म्हणत आहेत, “बदल हवा, चेहरा नवा, दक्षिण सोलापूरमध्ये धर्मराज काडादी यांचीच हवा !”