लिंगायत, धनगर, मराठा, मुस्लिम समाज झाला एक, धर्मराज काडादींसाठी मतदारसंघ सेफ

0

सोलापूर,दि.12: सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. काडादी यांना विविध जाती धर्मातील लोकांनी एकत्र येत पाठिंबा दर्शवला आहे. काडादी यांना लिंगायत, धनगर, मराठा, मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा मिळतो आहे. 15 जून 2023 ला श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याची चिमणी पाडण्यात आली होती. याचा परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला होता. 

‘तुमच्या उन्मत सत्तेचा बुरुज बळीराजा असाच जमीनदोस्त करेल’ आजचा दिवस सोलापूरच्या इतिहासातला काळा दिवस असून, दळभद्री मानसिकतेचा जाहीर निषेध, आज फक्त चिमणी पडली नाही तर इथला कामगार देशोधडीला लागला आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीतही याचा परिणाम दिसून येणार आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. 

धर्मराज काडादी यांना सोलापूर शहरी भागासह ग्रामीण भागातील लिंगायत, धनगर, मराठा, बौध्द, मुस्लिम समाजातील अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे ‘लिंगायत, धनगर, मराठा, मुस्लिम समाज झाला एक, धर्मराज काडादींसाठी मतदारसंघ सेफ’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या मतदारसंघात लिंगायत आणि धनगर समाजाचे मतदारांची संख्या लक्षणीय आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here