Solapur: सोलापुरात संभाजी ब्रिगेडने हर हर महादेव चित्रपट पाडला बंद

Solapur Har Har Mahadev सोलापुरात हर महादेव चित्रपटाचा शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडला

0

सोलापूर,दि.8: Solapur News: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) तसेच चुकीचा इतिहास दाखवून मावळ्यांची बदनामी करणाऱ्या हर हर महादेव चित्रपटाचे (Har Har Mahadev) शो संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापुरात बंद पाडण्यात आले.

हर हर महादेव या चित्रपटात महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा व सरदारांचा चुकीचा इतिहास दाखवून प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदनामी केली आहे. इतिहासाची मोडतोड करुन विकृतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. त्यामुळे सदर चित्रपटाचे शहरातील चित्रपटगृहात दाखवण्यात येणारे शो आजपासून दाखविण्यात येऊ नयेत, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे शो बंद पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, राजू भोसले कार्याध्यक्ष, अरविंद शेळके उपाध्यक्ष, गजानन शिंदे उपाध्यक्ष, सिताराम बाबर, प्रवीण जंगणमठ, सुलेमान पिरजादे, सोमनाथ देवकुळे, सागर देवकुळे, जिल्हा सचिव राहुल सावंत, अनिल माशाळ, राजेंद्र माने, दत्ता जाधव आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here