सोलापूर संभाजी ब्रिगेडचे पत्रकार व पोलीस यांच्यावरील अन्यायाविरूद्ध धरणे आंदोलन

अन्यायकारक निलंबनाची कारवाई त्वरित मागे घ्यावी अन्यथा सोलापूर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे

0

सोलापूर,दि.12: सोलापूर संभाजी ब्रिगेडने पत्रकार व पोलीस यांच्यावरील अन्यायाविरूद्ध धरणे आंदोलन केले आहे. भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर आठ पोलीस कर्माचारी तर तीन पोलिस अधिकाऱ्यांवर निंलबनाची अन्यायकारक कारवाई करण्यात आली. ही कारवाई रद्द करण्यात यावी म्हणून सोलापूर संभाजी ब्रिगेडच्या वतीने धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

झालेली कारवाई म्हणजे लोकशाहीची गळचेपी करण्यासारखा प्रकार : सोलापूर संभाजी ब्रिगेड

याप्रकरणी कोणत्याही पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी करून देखील पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस प्रशासन व पत्रकार यांच्यावर झालेली कारवाई म्हणजे लोकशाहीची गळचेपी करण्यासारखा प्रकार आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील अन्यायाविरुद्ध न्याय देण्याचे काम करीत असताना ही कारवाई संविधान विरोधी आहे.

सोलापूर संभाजी ब्रिगेड
सोलापूर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते निवेदन देताना

पोलीस यंत्रणा नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडते

पोलीस यंत्रणा ही कायद्याची अंमलबजावणी करून नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडते. ऊन पाऊस वारा याची तमा न करता नागरिकांच्या संरक्षणासाठी व नेत्यांच्या बंदोबस्तासाठी 24 तास आपली प्रामाणिकपणे सेवा बजावत असतात. सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक नेते महापुरुषावर बेताल वक्तव्य करून त्यांचा अवमान करीत आहेत.

पोलीस हा शेवटी मानवच आहे मशीन नाही

त्याचे पडसाद समाजमध्ये उमटून जनतेची प्रतिक्रिया हिंसक होऊन अशा घटना घडत आहेत. या संतापजनक घटना राजकीय नेत्यामुळेच घडलेले आहेत. यात पोलिसांचा कोणताही दोष नाही. पोलीस हा शेवटी मानवच आहे मशीन नाही, जी त्याला गुन्ह्य़ांचा आधी पूर्वकल्पना मिळू शकेल. त्यामुळे राज्य शासनाने जी पत्रकार व पोलिसावर कारवाई केली ते अन्याय कारक असून त्यांच्यावर झालेली अन्यायकारक निलंबनाची कारवाई त्वरित मागे घ्यावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम (Shyam Kadam), जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके, जिल्हा सचिव राजेंद्र माने, शहर संघटक दत्ता जाधव, बबन डिंगणे, मुस्तफा शेख, महेश सरोदे, मंजुनाथ पास्ते, नागेश शिल्पकार, उपाध्यक्ष सिताराम बाबर इत्यादी उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फारुख शेख, युवराज पवार, केरू जाधव, अंगद मुके, मिलिंद प्रशाले, वसंत बचुटे, अशोक दिलपाक, अशोक भालेराव आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here