सोलापूर संभाजी ब्रिगेड बैठक संपन्न, शाम कदम यांची फेरनियुक्ती

0

सोलापूर,दि.२२ : मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडच्या सोलापुर जिल्हा उत्तर विभागाच्या पुनर्गठन-पुनर्बांधणी बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी (सावंतवाडी ता.उत्तर सोलापूर) येथील हनुमान मंदिर याठिकाणी ही बैठक पार पडली. यासोबतच सावंतवाडी आणि अकोलेकाटी या गावांमध्ये मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडच्या ग्रामशाखांचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष अमोल काटे, शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे, प्रदेश संघटक प्रदिप कणसे, पुणे विभाग अध्यक्ष दीपक वाडदेकर कोकण अध्यक्ष सचिन सावंत, नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे, गणेश पाटील शिंदे, बालाजी पाटील जाधव, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख अनिल माने, इत्यादि पाहुणे उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये संभाजी भोसले यांची सोलापुर जिल्हा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष व श्याम कदम यांची सोलापुर महानगराध्यक्ष पदावर फेरनियुक्ती करण्यात आली. यावेळी सोलापुर जिल्हा व महानगर अध्यक्षांनी आपल्या कार्याचा अहवाल सादर केला. या कार्यक्रमात सोलापुर महानगर कार्यकरिणीचीही निवड करण्यात आली.

मनोगतामध्ये बोलत असताना प्रदेश संघटक प्रदिप कणसे यांनी सांगितले की ‛संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड तरुणांच्या आर्थिक सक्षमीकरणावर काम करणार आहे.’ शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकताना सरकारच्या धोरणांवर टीका केली. सोयाबीन व इतर शेतमालांचे दर घसरण्यामागे सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष व सोलापुर जिल्हा संपर्कप्रमुख अमोल काटे यांनी संभाजी ब्रिगेडच्या “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला” या विचारांची संकल्पना स्पष्ट करताना जास्तीत जास्त तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे, त्यासाठी संभाजी ब्रिगेड आपल्याला सहकार्य करण्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here