Solapur: हवामान विभागाचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा 

0

सोलापूर,दि.१५: Solapur Rain Alert: सोलापूरसह (Solapur) अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला. सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच हवामान विभागाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबई, पुणे, सोलापूरसह राज्यातील अनेक भागात संततधार सुरूच आहे.

आज (१५ सप्टेंबर) दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Solapur Rain Alert News)

Solapur Rain Alert

बंगालच्या उपसगरासमवेत अरबी समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यातील घाटमाथ्यावरील परिसरासह मुंबई, कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सोलापूरला मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे, पुढील ३ तासांत राज्यातील सोलापूर, अहिल्यानगर, बीड, पुणे, या जिल्ह्यांतील काही ठिकाणी ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ येण्याची शक्यता आहे.  

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पुणे, सातारा घाटमाथ्यावर पुढील २४ तासांत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या चारही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here