मद्यप्राशन करुन वाहन चालविणारे आता वाहतूक पोलीसांच्या रडारवर

0

सोलापूर,दि.६: सोलापूर (Solapur) शहरात काही वाहन चालक हे मद्यप्राशन करुन वाहने धोकादायक रित्या चालवित असल्याचे तक्रारीत वाढ होत असल्याने नुतन पोलीस आयुक्त सुधिर हिरेमठ (Police Commissioner Sudhir Hiremath) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अमंलदार हे मद्यप्राशन करणारे व्यक्तींबाबत खातर जमा करुन वाहन चालविणारे वाहन चालकांची वाहने ताब्यात घेवून मद्यप्राशन करुन वाहन चाललिल्याबद्दल खटला थेट कोर्टात पाठविण्यास सुरुवात केलेली आहे.

हेही वाचा Vishwas Nangare Patil: सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील सलमान खानच्या घरी

दिनांक ०४/०६/२०२२ व दिनांक ०५/०६/२०२२ असे दोन दिवस महत्वाचे चौकात अचानकपणे विशेष मोहिम राबवून मद्यप्राशन करणारे वाहन चालकांबाबत तपासणी केली असता एकूण ४० वाहन चालक मद्यप्राशन केल्याचे आढळून आल्याने त्यांचेवर ठोस कारवाई होण्याचे दृष्टीने त्यांचे वाहने ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द न्यायालयात थेट खटले दाखल करण्यात आलेले आहेत.

मद्यप्राशन करुन वाहन चालविणारे चालकांवर सातत्याने अशा प्रकारच्या कारवाई करण्यात येणार असून कोणीही मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये. कोणी मद्यप्राशन करुन वाहन चालविताना आढळून आलेस, त्यांचे वाहन जप्त करुन त्यांच्यावर ठोस व कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे अवाहन पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), सोलापूर शहर डॉ. दिपाली धाटे यांचेव्दारे करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here