Home सोलापूर वार्ता निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची बातमी: हयातीच्या दाखल्यासाठी उद्या विशेष मोहीम

निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची बातमी: हयातीच्या दाखल्यासाठी उद्या विशेष मोहीम

0

सोलापूर,दि. २५ : जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी हयातीचा दाखला (Digital Life Certificate – DLC) सादर करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर तसेच जिल्ह्यातील सर्व उपकोषागार कार्यालयांच्या ठिकाणी उद्या, गुरुवार (दि. २६ नोव्हेंबर २०२६) रोजी सकाळी ११ वाजता विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला सादर करण्याबाबत मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. वैभव राऊत यांनी केले आहे.

मेळाव्याला उपस्थित राहताना संबंधितांनी स्वतःचा मोबाईल, आधारकार्ड, निवृत्तीवेतन आदेश (PPO) आणि बँक पासबुकची प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. याशिवाय, हयातीचा दाखला ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यासाठी https://jeevanpramaan.gov.in या ‘जीवन प्रमाण’ पोर्टलचा वापर करता येईल. अँड्रॉइड स्मार्टफोनवर ‘जीवन प्रमाण’ (Jeevan Pramaan) ॲप डाउनलोड करूनही ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येते.

याबाबत अधिक माहितीसाठी निवृत्तीवेतनधारकांनी solapur.pension@gmail.com या ई-मेलवर किंवा ०२१७-२७३१०३६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.