Solapur News: सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) लागू

0

सोलापूर,दि.१४: Solapur News: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच समाजकंटक व गुंडप्रवृत्ती इसमांवर प्रतिबंधक कारवाई करणे सोयीचे जावे, यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून) दिनांक २२ जूनच्या रात्री २० वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) चे आदेश लागू करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) लागू | Solapur News

अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ ते फ) अन्वये याबाबतचा मनाई आदेश निर्गमित केला आहे.

या मनाई आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत

या मनाई आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून) पुढीलप्रमाणे वर्तन करण्यास दिनांक २२ जूनच्या रात्री २० वाजेपर्यंत मनाई करण्यात आली आहे. यामध्ये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, सुरे, काटी किंवा झेंडा लावलेली काटी किंवा शरीरास ईजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे-आणणे, दगड अगर तत्सम वस्तु, शस्त्रे हाताळणे, अगर त्याचा फेकून मारण्यासाठी उपयोग करणे. कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक घोषणा करणे. असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर नीर्तीविरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल अशी सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करणे, असे वर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

या हुकुमाचे खंड अ ते फ ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपनिर्दीष्ट वस्तु हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तिंना जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू पडणार नाहीत. हा आदेश सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) अंमलात राहील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here