सोलापूर,दि.१३: solapur news: पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने विजापूर रस्त्यावरील गुलमोहर ऑर्केस्ट्रा अँड बारवर (Gulmohar Orchestra And Bar) छापा टाकून ४९ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पावणेतीन लाख रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे ६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तानाजी देवराव लकडे, बारचालक आकाश चंद्रकांत जाधव, वेटर शिवानंद वसू मसळीकर, देविदास दगडू गायकवाड, गणेश दगडू गायकवाड, अभिषेक मनोज दणाणे तसेच ग्राहक मल्लिकार्जुन दुडप्पा मरुळ, इरण्णा जटप्पा पुजारी, वरकतअली मकसुद कुरेशी, अमर महादेव कोंजारी, अमितकुमार नानासाहेव मोटे, सिकंदर माणिक धोत्रे, मिराज जलिल कुरेशी, गौस अब्दुल गफुर टक्कळकी, आकाश सत्यवान हजारे, रवी प्रकाश निकम, प्रसाद मल्लिकार्जुन आळंद, ताज महिबूबसाब उमराणी, रियाज अहमद इमामसाव पठाण, सैफअली शरीफ बागवान, इब्राहीम नवी पटेल, मो. इरफान मेहताबसाब पटेल, नदीम वद्रुद्दीन पेंडारी, आरिफ बशीर कलेगार, शिरीष राम गायकवाड, आकाश संजय पठारे, रोहन रवींद्र गंगणे, महमद तौसिफ महमद जाफर तेनाली, निसार अहमद इसाक सातवच्चे, संतोष बाळ रेड्डी, गौस रसूल पटेल, महेश राजकुमार ठाकूर, जब्बार खाजाभाई बागवान, अख्तार हुसेन गुलामगौस दर्जी, अरबाज सैपन शेख, माणिक तिप्पा रेड्डी, अमितकुमार राजेंद्र समदळ, महमद जाहीद महमद अलीमदंड, अनिकेत नागनाथ गोरट्याल, इब्राहीम सलिम शेख, सैपन शब्बीर इरकल, सलिम जब्बार तिलगर, गणपती बसवराज पुजारी, पांडुरंग अर्जुन शामल, सागर कट्याप्पा गायकवाड, विनोद व्यंकट सूर्यवंशी, रितेश अरविंद मारगम, यश मधुकर सारंगी, समीर रफीक शेख यांना ताब्यात घेण्यात आले.
शनिवारी पहाटे सव्वातीन वाजता गुलमोहर ऑर्केस्ट्रा अँड बार समोरुन पोलीस पथक गस्त घालत असताना त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात आवाज येत असल्याने शहानिशा करून विशेष पोलीस पथकाने छापा टाकला. नृत्याविष्कार चालू असणाऱ्या ठिकाणी स्टेजवर १३ नर्तिका अंगावर तोकडे कपडे घालून बीभत्सपणे अश्लील हावभाव करुन संगीताच्या तालावर अश्लील नृत्य करीत होत्या. ग्राहक त्यांच्याकडे हातवारे करुन बीभत्सपणे हावभाव करुन, नकली दहा रुपयांच्या नोटा नर्तिकांच्या अंगावर उधळत होते.
याप्रकरणी विजापूर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनास्थळावरुन २ लाख ७१ हजार ३८० रुपयांची रोकड, ७ मोटारसायकली, ८ चारचाकी वाहने व नृत्याविष्कारासाठी वापरात आणलेले साऊंड सिस्टम, इतर साहित्य असा एकूण ५९ लाख ७८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त हरीश वैजल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, पोलीस अंमलदार दिलीप भालशंकर, योगेश वर्डे, वाजिद पटेल, संजय साळुंखे, नरेंद्र नक्का यांनी केली आहे.