Solapur News: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3) अन्वये मनाई आदेश लागू

Solapur: अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी याबाबतचे आदेश जारी केले

0

सोलापूर,दि.10: Solapur News: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 9 ते 23 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ ते फ) व 37 (3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र | Solapur News

पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र | Solapur News

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, भाले, दंडे, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, आणणे, दगड अथवा तत्सम वस्तु, शस्त्रे हाताळणे अगर त्याचा फेकून मारण्यासाठी उपयोग करणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर नीती विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल, अशी सोंगे अगर चिन्हे, कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

यांना लागू राहणार नाही आदेश

हा आदेश अत्यावश्यक सेवा, तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तिंना जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रा.), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here