Solapur MNC: ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत आयुक्त पी शिवशंकर यांनी घेतली बैठक

0

सोलापूर,दि.25: Solapur MNC: जगभरासह महाराष्ट्रमध्ये ओमिक्रॉन व्हेरीयंटचा (omicron varient) प्रादुर्भाव वाढत आहे. कोविड-19 (Covid – 19) संदर्भात शासन निर्देशानुसार नव्याने निर्माण होणाऱ्या omicron varient च्या अनुषंगिक उपाययोजना बाबत चर्चा करण्यासाठी आज आयुक्त यांच्या कार्यालयात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी बैठक घेऊन चर्चा केली.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, सहाय्यक आयुक्त महनवार,नगर अभियंता संदीप कारंजे, सहाय्यक नगर रचना संचालक लक्ष्मण चलवादी, प्रशासनाधिकारी कादर शेख अग्निशामक दल प्रमुख केदार आवटे मुख्य लेखापाल शिरीष दनवे, आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे, डॉ.आतिश बोराडे, डॉ. हराळकर तसेच सर्व विभागीय कार्यालयाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील ॲंटीजन टेस्ट तसेच rt-pcr टेस्ट वाढवणे, मयत झाल्यानंतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे. त्याची माहिती तयार करून रिपोर्ट सादर करणे, पेशंट सापडलेल्या ठिकाणी फवारणी करणे तसेच ऑक्सिजन बेडची व्यवस्था करणे, बेडस वाढवणे, कंट्रोल रूम ऍक्टिव्ह करणे, तसेच सर्व विभागीय अधिकारी व मुख्य आरोग्य निरीक्षक यांना दंडात्मक वसुलीबाबत माहिती देणे व शहरातील नागरिकांचे लसीकरण संख्या वाढविणे आदी संदर्भात आयुक्त पी. शिवशंकर यांनी संबंधितांना आदेश दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here