Solapur MNC: सोलापूर शहरात 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून होणार: उपायुक्त धनराज पांडे

0

सोलापूर,दि.29: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (25 डिसेंबर) ओमिक्रॉन व्हेरीयंट (Omicron Variant) या कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत देशाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आता देशात लसीकरण सुरू होईल. पुढील वर्षी 3 जानेवारीपासून ते सुरू होणार आहे. त्याच वेळी, खबरदारी म्हणून, सरकारने निर्णय घेतला आहे की लसीचा डोस आरोग्यसेवा आणि आघाडीवर असलेल्या कामगारांसाठी देखील सुरू केला जाईल. पुढील वर्षी 10 जानेवारीपासून ते सुरू होणार आहे.

सोलापूर शहरात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या तीन जानेवारी पासून सुरू होणार असल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली आहे. हेल्थ वर्कर्स व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनाही बूस्टर डोस देण्यात येणार आहे. बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

1 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांनाही ‘जापनीज इन्सिलेपसिस’ या आजारासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. 3 ते 21 जानेवारी या दरम्यान 1 लाख 82 हजार मुलांना ही लस देण्यात येईल. सर्व शाळांमध्येही लसीकरण करण्याबाबत तयारी सुरू असल्याचे उपायुक्त पांडे यांनी सांगितले.

केंद्र सरकार ने जाहीर केल्याप्रमाणे येत्या 3 जानेवारी पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना पहिला लसीकरणाचा डोस दिला जाणार असल्याची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. या वयोगटातील मुलांना फक्त कोव्हॅक्सीन ही लस दिली जाणार असून महापालिकेच्या सर्व केंद्रावर ही लस उपलब्ध असणार असून जास्तीत जास्त युवक युवतींनी आपले लसीकरण करून घ्यावे असेही आवाहन उपायुक्त पांडे यांनी केले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here