सोलापूर,दि.24: Solapur: सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे (Jayraj Nagansure) यांनी नगर भूमापन अधिकारी किरण कांगणे (City Land Survey Officer Kiran Kangane) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बोगस कॉम्प्रोमाइज डिक्री (Compromise Decree) करून जागा हडपल्याप्रकरणी नागणसुरे यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. सोलापूर सिटी सर्वे नंबर 9921/ 1/अ/2 ही जागा बोगस कागदपत्राद्वारे बोगस कॉम्प्रमाईज डिक्री करून हडप केल्याबद्दल संबंधितांवर फौजदारी दाखल करण्याबाबत जयराज नागणसूरे यांनी तक्रार केली होती.
काय होते प्रकरण? | Jayraj Nagansure
Civil अपील नंबर 160/ 2012 च्या कॉम्प्रोमाईज डिक्री करून सिटी सर्वे नंबर 9921/1/अ/ 2 ही जागा खालील लोकांनी हडप केलेली आहे. गंगाबाई शंकर मळगे, नागनाथ शंकर मळगे, श्रीदेवी पुजारी, अंबुबाई सिद्धप्पा मळगे, राजकुमार सिद्धपा मळगे, इरण्णा शेंडगे, सखुबाई मळगे, उमा वाघमोडे, अंबुबाई थावरे, रेणुका कोळेकर चन्नम्माबाई आडोळी, भारती जोगदंड, रामराव जोगदंड, नितीन जोगदंड, मीनाक्षी जगताप या सर्वांनी संगणमत करून सोलापूर कोर्टातील जिल्हा न्यायाधीश दोन पवटवाडकर यांच्या कोर्टात रजिस्टर civil अपील नंबर 160/ 2012 हा बोगस बेकायदेशीर कॉम्प्रोमाईज डिक्रि सादर करून कोर्टाची फसवणूक केली असे नागणसूरे यांनी सांगितले.
बोगस बक्षिस पत्राच्या नोंदीचा कारनामा? | Solapur
हे प्रकरण ताजे असताना नगर भूमापन अधिकारी सोलापूर किरण कांगणे यांनी अजून एक प्रताप केलेला आहे. सिटी सर्वे नंबर 10377/21 फायनल प्लॉट नंबर 44 / 21 या मिळकत पत्रिकेवर दिनांक 1971 रोजीचा नोंदीमध्ये शोभा रेवनसिद्ध कट्टीमणी यांच्या नावाची नोंद दाखल करण्यात आलेली आहे. परंतु सदरील मूळ मिळकत पत्रिकेची पडताळणी करता मिळकत पत्रिकेवर मूळ नोंदीमध्ये उपरी लिखाण करून 1971 चा नोंदीमध्ये नावे उपर लिखाण करून बोगस नोंद करण्यात आलेले दिसून येते. त्याचप्रमाणे मिळकत पत्रिकेवर 1971 मध्ये 2013 चा दस्त नोंद केल्याचे दिसून येते तसेच सदरील नोंद करिता कोणताही फेरफार अथवा कागदपत्राविना शोभा रेवणसिद्ध कट्टीमनी म्हणून यांच्या नावाची बोगस नोंद झाली आहे, असा दावा जयराज नागणसुरे यांनी केला आहे.
किरण कांगणे हे सोलापूरला नगर भूमापन अधिकारी म्हणून हे कार्यरत आहेत. हे बोगस उतारा कोणताही कागदपत्र उपलब्ध नसताना, कोणत्याही बक्षीस पत्र उपलब्ध नसताना, त्याची नोंद झालीच कशी आणि महत्त्वाचे म्हणजे 2017,18 पर्यंत उतारे हे ऑनलाईन नव्हते. 2017,18 नंतर उतारे ऑनलाइन झाले, म्हणजेच शोभा कट्टीमनी यांचा दस्त 2013 चा 1971 सालामध्ये नोंद झाला कसा आणि ही बाब अधिकारी जे ए साळवे यांना ऑगस्ट 2022 ला लक्षात आली व त्यांनी अहवाल दिला की ही नोंद बोगस झालेली आहे, त्याचे कागदपत्र बक्षीस पत्र उपलब्ध नाहीत. असे असताना किरण कांगणे यांनी तेव्हाच गुन्हा दाखल करणे गरजेचे होते, परंतु अनेकांनी माहितीचे अधिकाराखाली वरील सिटी सर्वे नंबर चा माहिती मागितली असता प्रत्येकाला त्यांनी ही माहिती उपलब्ध नाही असे उत्तर दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसूरे यांनी 18-1- 2023 ला वरील सिटी सर्वे नंबर ची माहिती अधिकाराखाली मागितली आता आपले पितळ उघडे पडेल त्या भीतीने त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस ठाण्यांना नगर भूमापन अधिकारी यांनी कळविले की वरील सिटी सर्वे नंबर मध्ये बोगस नोंद झालेली आहे, तरी त्वरित गुन्हा दाखल करावा वास्तविकता ही नोंद किरण कांगणे यांच्या कारकिर्दीतच झाली आहे असे असताना हे प्रकरण लपवून ठेवण्यात आले. असा गंभीर आरोप नागणसुरे यांनी केला आहे. ज्यावेळेस माहितीचा अधिकार खाली लोकांनी माहिती मागितली त्यावेळेस कागदपत्र उपलब्ध नसले तर गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. तरी त्यावेळी त्यांनी ही बाब लपवून ठेवली.
सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसूरे यांनी लोकायुक्त महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त, सोलापूर जिल्हाधिकारी आणि सोलापूर पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे की, वरील प्रकरणात नगर भूमापन अधिकारी सोलापूर किरण कांगणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दिली आहे.
अस्वीकरण: बातमीतील दाव्याच्या सत्येतेची हमी सोलापूर वार्ता घेत नाही.