Solapur IT Raids: सोलापुरात आयकर विभागाच्या धाडी, प्रसिद्ध हॉस्पिटल्स, कारखाने आणि उद्योगांची तपासणी

0

सोलापूर,दि.26: Solapur IT Raids: सोलापूर (Solapur) शहरात काल (25 ऑगस्ट) सकाळपासून आयकर विभागाचे धाडसत्र (IT Raids) सुरु होते. शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक, रुग्णालयांची आयकर विभागाच्यावतीने चौकशी सुरु आहे. यासंदर्भात अद्याप तरी आयकर विभागाच्यावतीने कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सकाळी सात वाजल्यापासून शहरात जवळपास सहा ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी कर्मचारी कागदपत्रांची तपासणी करत असल्याची माहिती आहे.

सोलापूर पहाटे पाचची एकाचवेळी पुणे पासिंगची अनेक वाहने सोलापूर शहरात धडकली. त्यानंतर अनेक हॉस्पिटल, कन्ट्रक्शन कार्यालय कारखान, शोरुम व निवासस्थानी आयकर विभागाची टीम पोहचली. सकाळी सुरू झालेली आकर विभागाची झाडाझडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहूल कन्सट्रक्शन या ठिकाणी सकाळपासून झडती सुरु आहे. आयकर विभागाच्या पुणे येथील पथकाच्या माध्यमातून मेहूल कन्स्ट्रक्शनच्या कागदपत्रांची तपासणी अधिकारी करत आहेत. सोबतच बिपीनभाई पटेल संचालक असलेल्या सोलापूर शहरातील कुंभारी परिसरात असलेल्या अश्विनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी देखील आयकर विभागाचे पथक दाखल झाले.

सोबतच बिपीनभाई पटेल संचालक असलेल्या सोलापूर शहरातील अश्विनी हॉस्पिटल आणि कुंभारी परिसरात असलेल्या अश्विनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी देखील आयकर विभागाचे पथक दाखल झाले.

सोलापुरातील आयकर विभागाचे वरीष्ठ अधिकारी बिपीनभाई पटेल यांच्या घरी ठाण मांडून बसले होते. सकाळपासून पटेल यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व कार्यालयांची चौकशी सुरु असल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र यासंदर्भात आयकर विभाग किंवा पटेल यांच्यावतीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सोलापुरातील दोन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञांच्या रुग्णालयात देखील आज सकाळी आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले. सोलापुरातील सात रस्ता परिसरात असलेल्या डॉ. गुरुनाथ परळे यांच्या स्पंदन हार्ट क्लिनिक याठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी तपासणी केली. तसेच सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ अनुपम शहा यांच्या हॉस्पिटलवर देखील आयकर विभागाने छापा टाकला आहे. सकाळपासून आयकर विभागाचे पथक या ठिकाणी तपासणी करत होते.

सोलापुरातील प्रसिद्ध रघोजी किडनी अँड मल्टीस्टेट हॉस्पिटलमध्ये देखील आयकर विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली. काल सकाळपासून रघोजी हॉस्पिटल येथे आयकर विभागाचे पथक तपासणी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रघोजी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आयकर विभागाच्या उभी असल्याचे चित्र पाहायला मिळालं. सोलापुरात आयकर विभागाच्या वतीने प्रामुख्याने वेगवेगळ्या रुग्णालयांची तपासणी सुरू असल्याचे दिसतय. सोलापुरातील प्रसिद्ध आश्विनी रुग्णालय, कुंभारी येथे असलेले अश्विनी सहकारी रुग्णालय, स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल, डॉक्टर अनुपम शहा यांचे हार्ट क्लिनिक या ठिकाणी देखील आयकर विभागाच्या पथकाने तपासणी केली आहे.

महाराष्ट्रातील विविध भागात सुरु असलेल्या धाडसत्रांमध्ये सहभागी अधिकाऱ्यांच्या वाहनांवर कृषी अभ्यास शिबीराचे पोस्टर लावण्यात आले होते. सुत्रांच्या माहितीनुसार जवळपास 24 पथकांद्वारे विविध ठिकाणी कारवाया सुरु आहेत. यामध्ये 50 गाड्या आणि शंभरहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

सोलापूरमध्ये या ठिकाणी आयकर विभागातर्फे तपासणी

  1. मेहुल कन्स्ट्रक्शन
  2. अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर
  3. अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी
  4. बिपीन पटेल यांच्या घरी
  5. डॉ. गुरुनाथ परळे यांचे स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल
  6. डॉ. अनुपम शाह यांचे हार्ट क्लिनिक
  7. डॉ. विजयकुमार रघोजी यांचे रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here