Solapur Heat Wave: सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागाचा उष्णतेच्या लाटेचा इशारा

0

सोलापूर,दि.1: Solapur Heat Wave: सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असून आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. 21 मेला सोलापूरचे तापमान 43.5 अंश सेल्सिअस होते. तापमानात वाढ झाल्याने अनेकांना उपचार घ्यावे लागत आहेत.

हेही वाचा Jayant Patil Solapur: शिंदे गटातील पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले…

नाशिक तालुक्यातील राहुरी (Rahuri) येथे शेतकऱ्याचा तर मालेगाव जवळ एका ट्रक चालकाचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. तर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. साहेबराव शांताराम आव्हाड असे राहुरी येथील मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून अकोला येथील अकबर शहा मेहबूब मेहबूब शहा, नांदेड येथील विशाल रामदास मादसवार आणि पैठण तालुक्यातील तातेराव मदन वाघ असे मृत झालेल्या नागरिकांची नावे आहेत.

Solapur Heat Wave | उष्णतेच्या लाटेचा इशारा

1 जूनला सोलापूरचे 42.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबईच्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यातील काही भागात दि. 2 व 3 जून रोजी उष्णतेच्या लाटेसम स्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे गरजेशिवाय उन्हात जास्त फिरू नये, उन्हाच्या झळांपासून संरक्षण करण्यासाठी पुरेशी तयारी करूनच घराबाहेर पडावे. डोक्यावर टोपी घालावी किंवा सुती कपडा गुंडाळावा. सोबत पाणी, लिंबू पाणी किंवा ओआरएस ठेवावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here