Solapur Fire: सोलापूर एमआयडीसीतील रबर फॅक्टरीला भीषण आग

Solapur Fire: रबर फॅक्टरीला आग लागल्यानंतर आसपासच्या गारमेंट कारखान्यांनाही आगीने घेरले

0

सोलापूर,दि.15: Solapur Fire: सोलापूर एमआयडीसीतील गुजरात रबर फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसीतील गुजरात रबर फॅक्टरीला बुधवारी पहाटेच्या सुमारास मोठी आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 25 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम अजूनही सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान नुकसान किती झाले याची अद्याप माहिती मिळाली नाही.

25 जणांची टीम आग नियंत्रणात आणण्यासाठी सक्रिय | Solapur Fire

दरम्यान, एमआयडीसी मधील रबर फॅक्टरीला आग लागल्यानंतर आसपासच्या गारमेंट कारखान्यांनाही आगीने घेरले. मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेली आग सकाळी साडेसहापर्यंत धुमसत होती. सोलापूर महापालिका, तसेच एमआयडीसी, एनटीपिसी, अक्कलकोट शहर, बार्शी येथून 20 ते 25 अग्नीशमन गाड्या पाचारण करूनही आग आटोक्यात आली नाही. परिसरातील ईतर कारखानदार हवालदिल झाले. मिळेल ते साहित्य हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  मनपाचे केदार आवटे यांच्यां सह, 25 जणांची टीम आग नियंत्रणात आणण्यासाठी सक्रिय झाली होती.

यावेळी सोलापूर शहर पोलीस फौज फाटा तळ ठोकून आहे, आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे समजते. कोटीपेक्षा अधिक मालमत्ता भस्मसात झाली अशी प्राथमिक माहिती आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here