सोलापूर,दि.16 : सोलापूर जिल्ह्यात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यंतरी कमी होत असलेली रुग्ण संख्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा वाढत आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 243 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 176605 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 171822 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1106 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3677 झाली आहे. यात 2389 पुरुष व 1288 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 1107 अहवाल प्राप्त झाले. यात 864 निगेटिव्ह तर 243 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 142 पुरुष आणि 101 महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर 45 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2022/01/wp-1642327476284-686x1024.jpg)
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2022/01/wp-1642327493162-708x1024.jpg)
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2022/01/wp-1642327510918-692x1024.jpg)