सोलापूर,दि.20: सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. यात सर्वाधिक मतदान बार्शी विधानसभा मतदारसंघात झाले आहे. तर कमी मतदान सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात झाले आहे. आता सर्वांचे लक्ष निवडणूक निकालावर लागले आहे.
बार्शी विधानसभा
बार्शी विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 3,37,499 इतकी आहे. यात पुरुष मतदार 173453 आहेत. तर महिला मतदारांची संख्या 164002 इतकी आहे. येथे 72.52 टक्के मतदान झाले आहे. 2,44 740 मतदारांनी मतदान केले असून यात 128719 पुरूष मतदारांनी मतदान केले आहे. तर 116004 महिला मतदारांनी मतदान केले आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 3,82,754 इतकी आहे. यात यात पुरुष मतदार 195751 आहेत. तर महिला मतदारांची संख्या 186964 इतकी आहे. येथे 58.35 टक्के मतदान झाले आहे. 2,23,342 मतदारांनी मतदान केले असून यात 1,15,641 पुरूष मतदारांनी मतदान केले आहे. तर 1,07,691 महिला मतदारांनी मतदान केले आहे.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 3,28,572 इतकी आहे. यात यात पुरुष मतदार 1,62 467 आहेत. तर महिला मतदारांची संख्या 1,66,059 इतकी आहे. येथे 56.62 टक्के मतदान झाले आहे. 1,86,037 मतदारांनी मतदान केले असून यात 96,440 पुरूष मतदारांनी मतदान केले आहे. तर 89,582 महिला मतदारांनी मतदान केले आहे.
सूचना: अंतिम मतदान टक्केवारी आल्यानंतर मतदान टक्केवारीत वाढ होऊ शकते.