सोलापूर जिल्हा ग्रामीण 243 जणांनी केली कोरोनावर मात, कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ

0

सोलापूर,दि.22: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील उच्चांकी रुग्ण संख्या वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In Solapur) दिवसेंदिवस वाढत आहे. तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 723 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 179565 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 172951 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 2927 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3687 झाली आहे. यात 2395 पुरुष व 1292 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 2367 अहवाल प्राप्त झाले. यात 1644 निगेटिव्ह तर 723 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 440 पुरुष आणि 283 महिलांचा समावेश आहे. आज 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 243 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

हेही वाचा Urfi Javed On Puspha: पुष्पाच्या गाण्यावर उर्फी जावेदचा किलर परफॉर्मन्स, साडीत सौंदर्य खुलले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here