Solapur | चंद्रकांत पाटलांना संपविण्यासाठी देवेंद्र फडणवीस आतुर: सुषमा अंधारे

Solapur News: सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे

0

सोलापूर,दि.26: Sushma Andhare Solapur | शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चंद्रकांत पाटलांना संपविण्यासाठी देवेंद्र फडणवीस आतुर असल्याचे म्हटले आहे. सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या सभेमध्ये सुषमा अंधारे बोलत होत्या. अंधारे यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. (Sushma Andhare Solapur News)

सुषमा अंधारे यांनी सभेमध्ये अनेक व्हिडिओ दाखवले | Sushma Andhare Solapur

“दादा लाव रे व्हिडिओ, आज धुरळाच काढते..” तेरा वर्षांपूर्वीचा 14 सेकंदाचा व्हिडिओ काढून माझी प्रतीकात्मक तिरडी बांधण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आजवर याविषयी अनेकांनी अक्षपार्ह विधाने केली त्याबद्दल भाजप काहीच कसे बोलत नाही. याबाबत सुषमा अंधारे यांनी सभेमध्ये अनेक व्हिडिओच दाखवले.

हेही वाचा Rewa Crime News: प्रेयसीला बेदम मारहाण करणाऱ्या पंकज त्रिपाठीला अटक, घरावर चालवला बुलडोझर

Sushma Andhare Solapur

50 खोक्यासाठी 40 गद्दार दादांनी नियत बदलली | Sushma Andhare Solapur News

ना हिंदुत्वासाठी, ना निधीसाठी हे गेले स्वतःच्या स्वार्थी 50 खोक्यासाठी 40 गद्दार दादांनी नियत बदलली” असल्याचे विधान अंधारे यांनी केले. यावेळी शिवसेना नेत्या संजनाताई घाडी, सोलापूरचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, सहसंपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके, शरद कोळी, तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, युवा सेना सोशल मीडियाचे आयोद्या पोळ, पुनम अभंगराव, शहरप्रमुख कमरूद्धीन खतीब, भारत मोरे, युवासेनेचे तालुकाप्रमुख सुभाष भोसले, शहर प्रमुख सौरभ चव्हाण, तुषार इंगळे, गोरख येजगर, अरविंद पाटील, अस्लम मुलानी, नवल गाडे, शंकर मेटकरी आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

जाहिरात

शहाजीबापूंनी उत्तरे द्यावीत: अंधारे | Solapur News

तुळजाभवानी सूतगिरणी, पतंगराव कदम क्रेडिट सोसायटी, राधाकृष्ण दूध संघ व कुक्कुटपालन अशा वेगवेगळ्या संस्थांची जागा, शेअर्स, अनुदान कोठे गेले या प्रश्नांची उत्तरं शहाजीबापूंनी द्यावीत. “समदं ओक्के हाय असं म्हणणाऱ्यांनी सगळं गायब झालंय हे दाखवून किमान ढेकर तरी द्यायची होती,” अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली. रविवारी सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी, त्यांनी भाजपच्या कपटनिटी राजकारणावर टीका करताना देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. फडणवीसच जवळच्या नेत्यांना संपवत असल्याचं त्यांनी म्हटलं. 

चंद्रकांत पाटलांना संपविण्यासाठी देवेंद्र फडणवीस आतुर

भाजप हा पक्ष जवळ घेऊन संपवण्याचं काम करतो, भाजपने उत्तर प्रदेशात, दक्षिण भारतात ज्या पक्षांना जवळ घेतलं त्यांनाच संपवून टाकलं. भाजपचं राजकारण हे कपटनितीवर अवलंबून आहे, टीम देवेंद्रने ही कपटनिती आखली आहे, असे म्हणत अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जबरी टीका केली. भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी ज्यांना जवळ केलं, त्यांना पद्धतशीरपणे संपवलं, महाराष्ट्रात लोकनेत्या पंकजा मुंडेंना साईडलाईन केलं, तावडेंना साईडलाईन केलं होतं, पण ते तावडीतून सुटून पुढे निघून गेले. चंदक्रांत दादांवर आत्ता जे सुरू आहे, चंद्रकांत दादांसाठी ठरवून ट्रॅप टाकण्याचा डाव देवेंद्रजींचा आहे. देवेंद्रजीच चंद्रकांत पाटलांना संपविण्यासाठी आतुर झालेले आहेत, असा गंभीर आरोपही अंधारे यांनी केला. विशेष म्हणजे मी जबाबदारीने हे बोलत असून मी सिद्ध करून दाखवने, असेही त्यांनी म्हटलं. 

देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना गारद करणार

मी कल्याणच्या सभेत म्हटलं होतं, एकनाथभाऊ हे देवेंद्र फडणवीस तुम्हालाही गारद करणार. आता, बघा हिवाळी अधिवेशनात 83 कोटींचा भूखंड केवळ 2 कोटी रुपयांना कसा विकला, हा घोटाळा कोणी बाहेर काढला. भाजपच्या तिघांनी त्यांचा हा गेम केलाय, असे म्हणत फडणवीसांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याचं अंधारे यांनी म्हटलं. 

20 आमदार भाजपमध्ये उड्या मारतील

शहाजीबापूंनी तालुक्यातील विकास, महागाईवर बोलावे. केवळ “काय झाडी, काय डोंगार काय हाटेल” म्हणून विकास होत नसतो, असे बोलून शहाजीबापूंनी आतापर्यंत एकही पक्ष सोडला नाही, देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना संपवल्यानंतर 40 पैकी 20 आमदार भाजपमध्ये उड्या मारतील, त्यामध्ये शहाजीबापू एक असणार आहेत असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीतून दहा, पाच टक्के घेऊन…

माझा भाऊ शहाजीबापू तालुक्याच्या विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीतून दहा, पाच टक्के घेऊन स्वतःचा विकास करीत सुटल्याचा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला. शिवसेनेतून फुटून जे गद्दार गेले त्यांना ना हिंदुत्वासाठी, ना निधीसाठी, केवळ ते 50 खोक्यांसाठी गेले, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here