Solapur Crime: फोटो व्हायरलच्या धमकीने महिलेवर दुष्कर्म; आरोपीकडून दीड किलो सोने जप्त

Solapur Crime: बुलेट, ५० हजार हस्तगत; आरोपीला न्यायालयीन कोठडी

0

सोलापूर,दि.१६: Solapur Crime: एका विवाहित महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण करुन तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल २१७ तोळे सोने लाटले. शिवाय पाच लाखांची रोकड घेऊन तिच्यावर दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीकडून दीड किलो सोने, बुलेट व ५० हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. (Solapur Crime)

Solapur Crime | फेसबुकवर झाली होती ओळख

श्रीधर श्रीनिवास रच्चा (वय ३२, रा. दाजी पेठ) असे न्यायालयीन कोठडी मिळालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडितेला फेसबुकवर आरोपीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्यांच्यात ओळख वाढून प्रेमसंबंध निर्माण झाले. यातूनच त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. आर्थिक अडचण असल्याचे सांगून आरोपीने पीडितेकडून सुरुवातीला १५ हजार रुपये घेतले. ज्यानंतर पुन्हा दोन लाख रुपये घेतले. फॅक्टरी टाकायची असल्याचे सांगून एक कोटीची मागणी केली. यावरून त्यांच्यात वाद झाला.

Solapur Crime

फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

त्यावर आरोपीने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी पीडितेला दिली. यामुळे घाबरलेल्या पीडितेने घरातील सोन्याचा गट्टा व तयार दागिने असे सुमारे २१७ ग्रॅमचे सोने दिले. दरम्यान, ही बाब पीडितेच्या घरी समजल्यानंतर त्यास बोलावून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने प्रकरण मिटविण्यासाठी ४० लाखांची मागणी केली. यात तडजोड न झाल्याने आरोपीने व्यापाऱ्यांना आपल्या मोबाइलमध्ये फोटो असल्याचे सांगून पीडितेची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी रच्चा यास अटक केली होती. त्यास दिलेली सहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपीकडून दीड किलो सोने, बुलेट व ५० हजारांची रोकड हस्तगत केल्याचे पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here