सोलापूर,दि.१०: Solapur Crime: गावठी पिस्तुल व गुप्तीचा लोकांना धाक दाखवुन त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांना विवस्त्र करुन अश्लिल कृत्य करण्यास, शेण खाऊ घालण्यास भाग पाडणाऱ्या टोळीस अटक करुन एकुण २,२०,५०० / – रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दि. ०४/०२/२०२२ रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही इसम तुळजापुर नाका ते रुपा भवानी मंदिर दरम्यान जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्यांच्याजवळील पिस्तुलचा धाक दाखवुन लोकांना मारहाण व लुटमार करीत आहेत.
सदरबाबत माहिती पोनि / विजयालक्ष्मी करी यांना देऊन त्यांच्या आदेशाने रुपा भवानी मंदिराकडुन तुळजापुर नाकाकडे जाणाऱ्या सर्विस रोडच्या कोपऱ्यावर सापळा रचुन इसम १ ) सागर अरुण कांबळे वय २२ वर्ष धंदा – मजुरी रा. न्यु बुधवार पेठ, भिम विजय चौक, सोलापुर २ ) बुध्दभुषण नागसेन नागटिळक वय – २६ वर्ष धंदा – मंडप व्यवसाय रा. घर नं. ४९ / १८३ , न्यु बुधवार पेठ, आंबेडकर उद्यान जवळ, सोलापुर ३ ) सतीश ऊर्फ बाबुलाल अर्जुन गायकवाड वय २५ वर्ष धंदा – ड्रायव्हर रा. घर नं. १२६ मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापुर ४ ) अक्षय प्रकाश थोरात वय २६ वर्ष धंदा ड्रायव्हर रा. घर नं. ४८/८, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, न्यु बुधवार पेठ, विश्वदिप चौक, सोलापुर यांना ताब्यात घेतले.
त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात एक गावठी पिस्तुल, एक धारधार गुप्ती, चार मोबाईल फोन व दोन मोटारसायकल मिळुन आले. मिळालेल्या मोबाईलमधील व्हि. डी. ओ. ची दोन पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये वरील इसम हे त्याच्याकडील गावठी पिस्तुलचा व धारधार गुप्तीचा रस्त्याने येणारे जाणारे लोकांना धाक दाखवुन त्यांची आडवणुक करुन त्यांना मारहाण व दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी देऊन त्याना विवस्त्र करुन त्यांना हस्तमैथुन व अनैसर्गिक संभोग करणेस भाग पाडुन, त्यांना शेण खाऊ घालुन, अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडुन, त्यांचे व्हिडीओ रेकॉर्डींग करुन ते आपापसात व्हॉट्सअप मध्ये प्रसारीत केल्याचे दिसुन आले.
त्यामुळे नमुद चार इसमांविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं ५८/२०२२ भा. द. वि. कलम २९२,५०६ ( २ ), भारतीय हत्यार कायदा कलम ३,४,२५ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोनि / विजयालक्ष्मी करी हे करीत आहेत.
समस्त नागरीकांना आव्हान करण्यात येते की , वरील अटक आरोपींनी अश्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य केले असल्याबाबत माहिती असल्यास जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर येथे संपर्क साधावा. सदर आरोपींविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल करुन अटक केल्यामुळे परिसरातील नागरीकांनी पोलीसांप्रति सामाधानाची भावना व्यक्त केल्या आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त हरीष बैजल , पोलीस उप – आयुक्त ( परिमंडळ ) डॉ. वैशाली कडुकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग १, डॉ. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम, पोनि विजयालक्ष्मी कुरी ( गुन्हे ) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक – केतन मांजरे, पोह १११६ आबा थोरात, पोना / ६२८ सुरेश जमादार, पोना १२७४ अतुल गवळी, पोना १६८५ खाजप्पा आरेनवरु, पोकॉ १५३३ सोमनाथ थिटे, पोकॉ १६९ राजेश घोडके, पोकॉ ६१३ स्वप्निल कसगावडे, पोकॉ १९१७ यशसिंह नागटिळक, पोकॉ १४८८ सुहास गायकवाड, पोकॉ १५६४ गोपाळ शेळके, पोकॉ १५४५ शिवानंद बेळळे, पोकॉ १५०४ दत्ता काटे, पोकॉ १५७१ बाळ माने यांनी बजावली आहे.