सोलापूर शहर कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ तर जिल्हा

0

सोलापूर,दि.5: सोलापूर शहरातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सोलापूर शहर 337 अहवाल प्राप्त झाले. यात 302 निगेटिव्ह तर 35 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 12 पुरुष व 23 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत 1. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 138 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 15 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 33886 झाली आहे. तर यापैकी 32242 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1506 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 961 पुरुष व 545 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण 128 अहवाल प्राप्त झाले, यात 117 निगेटिव्ह तर 11 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 4 पुरुष व 7 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 84 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 186220 झाली आहे. तर यापैकी 182409 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3727 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2421 पुरुष व 1306 महिलांचा समावेश आहे.

पात्र नागरिकांनी व 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेणेही आवश्यक आहे. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर करणे हाच कोरोनावरील उपाय आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here