सोलापूर,दि.30: सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण कोरोना चाचण्यांची संख्या कमी आहे. चाचण्यांच्या संख्येच्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाल्याने नुकसान कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला होता. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण 1631 अहवाल प्राप्त झाले, यात 1338 निगेटिव्ह तर 293 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 174 पुरुष व 119 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2804 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 277 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 183389 झाली आहे. तर यापैकी 176888 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3697 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2402 पुरुष व 1295 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर 1107 अहवाल प्राप्त झाले. यात 1027 निगेटिव्ह तर 80 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 43 पुरुष व 37 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2207 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 91 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 32905 झाली आहे. तर यापैकी 29213 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1485 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 947 पुरुष व 538 महिलांचा समावेश आहे.




