सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण 835 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.27: सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. चाचण्यांच्या संख्येच्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाल्याने नुकसान कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला होता. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण 2080 अहवाल प्राप्त झाले, यात 1505 निगेटिव्ह तर 575 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 354 पुरुष व 221 महिलांचा समावेश आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2986 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 723 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 182619 झाली आहे. तर यापैकी 175937 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3696 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2401 पुरुष व 1295 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर शहर 659 अहवाल प्राप्त झाले. यात 545 निगेटिव्ह तर 114 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 49 पुरुष व 65 महिलांचा समावेश आहे. एक जणांची नोंद मृत्यू झाली आहे. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2245 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 112 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 32748 झाली आहे. तर यापैकी 29019 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1484 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 947 पुरुष व 537 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here