सोलापूर,दि.26: सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्येत घट तर कधी वाढ होत आहे. चाचण्यांची संख्याही कमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक भागात रुग्ण संख्येने थैमान घातले होते. आता अनेकांनी लस घेतल्याने कोरोनाचा इतका प्रभाव दिसून येत नाही. लसीकरण महत्वाचे आहे, त्यामुळे सर्वांनी कोरोनाची लस घेणे गरजेचे आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण 2249 अहवाल प्राप्त झाले, यात 1661 निगेटिव्ह तर 588 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 359 पुरुष व 229 महिलांचा समावेश आहे. एकही जणांचा मृत्यू झाला नाही. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3316 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 566 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 181661 झाली आहे. तर यापैकी 174653 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3692 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2398 पुरुष व 1294 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर 774 अहवाल प्राप्त झाले. यात 664 निगेटिव्ह तर 110 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 59 पुरुष व 51 महिलांचा समावेश आहे. एकही मृत्यू झाला नाही. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2232 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 100 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 32521 झाली आहे. तर यापैकी 28806 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1483 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 947 पुरुष व 536 महिलांचा समावेश आहे.