सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण 510 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.7: कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. सोलापूर शहर व जिल्हा चाचण्यांची संख्या कमी आहे. सोलापूर शहर व जिल्हा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शहर व जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण 426 अहवाल प्राप्त झाले, यात 348 निगेटिव्ह तर 78 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 44 पुरुष व 34 महिलांचा समावेश आहे. 1 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 989 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 340 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 185040 झाली आहे. तर यापैकी 180345 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3706 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2408 पुरुष व 1298 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर शहर 441 अहवाल प्राप्त झाले. यात 415 निगेटिव्ह तर 26 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 17 पुरुष व 19 महिलांचा समावेश आहे. 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 424 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 170 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 33331 झाली आहे. तर यापैकी 31407 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1500 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 956 पुरुष व 544 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here