सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण 293 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.5: सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण कोरोना चाचण्यांची संख्या कमी आहे. शहर व जिल्ह्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सोलापूर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली नाही. शहर व जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. शहर व जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

सोलापूर जिल्हा ग्रामीण 1228 अहवाल प्राप्त झाले, यात 1039 निगेटिव्ह तर 189 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 99 पुरुष व 90 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात 1 जणांची नोंद मृत म्हणून आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1304 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 293 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 184858 झाली आहे. तर यापैकी 179849 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3705 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2408 पुरुष व 1297 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर शहर 837 अहवाल प्राप्त झाले. यात 800 निगेटिव्ह तर 37 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 21 पुरुष व 16 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 538 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या निरंक आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 33271 झाली आहे. तर यापैकी 31237 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1496 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 954 पुरुष व 542 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here