सोलापूर,दि.2: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अजून मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत नाही. सोलापूर शहरातील चाचण्यांच्या प्रमाणात नवीन रुग्णांच्या संख्येत कधी वाढ तर कधी घट दिसून येत आहे तर जिल्हा ग्रामीण चाचण्यांच्या संख्येच्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाल्याने नुकसान कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला होता. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण 2260 अहवाल प्राप्त झाले, यात 1923 निगेटिव्ह तर 337 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 201 पुरुष व 136 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात 1 जणांची नोंद मृत म्हणून आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2016 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 383 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 184222 झाली आहे. तर यापैकी 178504 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3702 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2407 पुरुष व 1295 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर 1262 अहवाल प्राप्त झाले. यात 1209 निगेटिव्ह तर 53 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 19 पुरुष व 34 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2011 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 121 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 33083 झाली आहे. तर यापैकी 29579 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1493 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 951 पुरुष व 542 महिलांचा समावेश आहे.




