सोलापूर,दि.1: सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अजून मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत नाही. सोलापूर शहरातील चाचण्यांच्या प्रमाणात नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे तर जिल्हा ग्रामीण चाचण्यांच्या संख्येच्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाल्याने नुकसान कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला होता. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण 1870 अहवाल प्राप्त झाले, यात 1530 निगेटिव्ह तर 340 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 184 पुरुष व 156 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2063 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 588 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 183885 झाली आहे. तर यापैकी 178121 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3701 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2406 पुरुष व 1295 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर 946 अहवाल प्राप्त झाले. यात 873 निगेटिव्ह तर 73 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 44 पुरुष व 29 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2082 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 135 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 33030 झाली आहे. तर यापैकी 29458 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1490 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 949 पुरुष व 541 महिलांचा समावेश आहे.





