सोलापूर,दि.30: सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. सोलापूर शहर 678 अहवाल प्राप्त झाले यात 677 निगेटिव्ह तर 1 पॉझिटिव्ह आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण 1417 अहवाल प्राप्त झाले यात 1382 निगेटिव्ह तर 35 पॉझिटिव्ह आहेत. यात 19 पुरुष व 16 महिलांचा समावेश आहे. सोलापूर शहर आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 29402 झाली आहे तर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 27922 झाली आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 174236 झाली आहे तर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 170338 झाली आहे. सोलापूर शहर आज एकाही मृताची नोंद नाही तर आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या 1451 आहे यात 930 पुरुष तर 521 महिलांचा समावेश आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 4 मृतांची नोंद आहे तर आतापर्यंत 3630 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे यात 2363 पुरुष व 1267 महिलांचा समावेश आहे.





