Solapur: सोलापूर शहरात या ठिकाणी मिळणार १५-१८ वयोगटातील मुलांना लस

0

सोलापूर,दि.३१: सोलापूर (Solapur) शहरात शासनाच्या मार्गदर्शक सुचना नुसार दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीला हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ६० वर्षावरील व्यक्तीचे लसीकरण सुरू करण्यात आले. दिनांक २२ जून २०२१ पासून १८ वर्षावरील सर्व व्यक्तीचे लसीकरणाला सुरुवात झाले.

शहरात कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र ७३४८८३ इतक्या नागरिकांन पैकी ६०४९६७ (८२.३८%) इतक्या नागरिकांना लसीचा पहिला डोस दिलेला असून ३८९१०३ (५३१४) इतक्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिलेला आहे अदयाप १,२९,४१६ इतक्या नागरिकांनी अदयाप लसीचा एक ही डोस घेतलेला नाही.

भावनाऋषी, साबळे, देगांव, या नागरी आरोग्य केंद्रानी १००% लसीकरण पुर्ण केले असून उर्वरित नागरी आरोग्य केंद्रांनी ७५ % पेक्षा जास्त लसीकरण पुर्ण केलेले आहे. दाराशा, जिजामाता, नई जिंदगी, सिव्हिल, बाळे या नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात लसीकरणाचा वेग तुलनेने कमी आहे.

लसीकरणाचा वेग व व्याप्ती वाढवण्यासाठी मिशन युवा स्वास्थ, हर घर दस्तक, vaccine ऑन व्हिल यासारख्या विविध योजनांची प्रभावी अमलबजावणी म.न.पा. कार्यक्षेत्रात करण्यात येत आहे. धर्मगुरु व्दारे आवाहन करुन समाजा मध्ये जन जागृती करण्यात येत आहे.

शासनाचा मार्गदर्शक सुचना नुसार दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून शहरात विविध सहा लसीकरण केंद्रांवर १५ ते १८ वर्ष वयोगटातील लाभाथ्यसाठी कोव्हिड लसीकरण सुरु करण्यात येत आहे. यासाठी ऑन लाईन बुकींग करता येणार असुन दिनांक १ जानेवारी २०२२ पासून कोव्हिन पोर्टलवर बुकींग करता येणार आहे. रेल्वे हॉस्पील, सिव्हिल हॉस्पिटल, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, लोकमंगल हॉस्पिटल, SGR आयुर्वेद महाविदयालय व सोलापूर केअर हॉस्पिटल या केंद्रावर हे लसीकरण उपलब्ध आहे.

शहरात या वयोगटातील ५० हजार मुले असून त्यांना COVAXIN लस देण्यात येणार आहे. यासाठी लसीचा व SYRINGES चा पुरेसा साठा म.न.पा कडे उपलब्ध आहे.

यांनिमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत की, कोव्हिड पासून बचाव करण्यासाठी, संभाव्य तिसऱ्या लाटेपासून स्वतःचे व कुंटुबांचे रक्षण करण्यासाठी अधिकाधिक लसीकरण करून घ्यावे व शहराला कोरोना मुक्त करावे असे आवाहन महापालिकच्या वतीने करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here