सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा

0

सोलापूर,दि.12: सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. श्रीकांत देशमुख यांचा एका महिले सोबतचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये श्रीकांत देशमुख महिले बरोबर दिसत आहेत.

एका महिलेने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरूम मधील व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मोठी बदनामी झाली. हा व्हिडिओ मंगळवारी दुपारी प्रसारमाध्यमावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर काही वेळातच श्रीकांत देशमुख यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला. चंद्रकांत पाटील यांनी तो तातडीने स्वीकारत जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे दिला आहे तसे त्यांनी पत्र प्रसारमाध्यमांना पाठवले आहे.

काही दिवसांपूर्वी श्रीकांत देशमुख यांनी आपल्याला हॅनीट्रॅपमध्ये अडकविल्याची तक्रार मुंबईच्या ओशिवारा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्व स्तरातून उमटलेल्या प्रतिक्रियांनंतर तातडीने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

देशमुख यांचा एका महिलेसोबत बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत संबंधित महिला आणि देशमुख दिसत आहे. देशमुख हे अंतर्वस्त्रावर बेडवर बसलेले आहेत. संबंधित महिला मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन देशमुखांचे नाव घेत त्याने आपल्याला फसविल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. हे वाक्य ऐकताच देशमुख हे बेडवरून उठले आणि त्यांनी मोबाईलचे चित्रीकरण बंद केल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित देशमुख यांनी त्या महिलेवर हनीट्रॅपच्या आरोप करत ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here