सोलापूर,दि.20: सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडले. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी, शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार अमर पाटील आणि भाजपचे सुभाष देशमुख यांच्यात लढत झाली आहे. तर बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (ठाकरे गट) दिलीप सोपल आणि शिवसेनेचे (शिंदे गट) राजेंद्र राऊत यांच्यात लढत झाली आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे, काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे आणि एमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दी यांच्यात लढत झाली आहे. यात सर्वाधिक मतदान सांगोला विधानसभा मतदारसंघात झाले आहे. तर कमी मतदान सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात झाले आहे. आता सर्वांचे लक्ष निवडणूक निकालावर लागले आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 23 हजार 624 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 58.42 टक्के आहे. या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे विजयी होणार असल्याचे दिसून येत आहे.
बार्शी विधानसभा मतदारसंघ
बार्शी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 46 हजार 712 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी 73.10%. येथून माजी मंत्री दिलीप सोपल विजयी होणार असल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर शहर मध्य
सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 291 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी 57.77%आहे. येथून भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे विजयी होणार असल्याचे दिसून येत आहे.