सोलापूर जिल्ह्यातील या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद

भीमा नदी डिकसळ पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद

0

सोलापूर,दि.16: भीमा नदी डिकसळ पुल: करमाळा तालुक्यातील जिल्हा हद्द ते कोंढार चिंचोली खातगाव पोमलवाडी रस्ता प्र. जि. मा. 190 वरील भीमा नदीवरील ब्रिटिशकालिन सुमारे 165 वर्षे जुना असलेल्या डिकसळ पुलाचा काही भाग क्षतीग्रस्त झाला आहे.

सर्व प्रकारची वाहतूक बंद | भीमा नदी डिकसळ पुल

त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरील सर्व प्रकारची (जड, हलकी व इतर) वाहतूक बंद करण्यात आली असल्याचे अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. नागरिकांनी याची नोंद घेवून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे.

पुलाचा वापर या गावातील लोक करतात

या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा उपयोग करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जिंती, कोंढारचिंचोली, टाकळी, केत्तूर नं.1, 2, वाशिंबे, गोयेगाव, कुुंभारगाव, सावडी, दिवेगव्हाण, कात्रज, खातगाव, पोमलवाडी, हिंगणी, गुलमोहोरवाडी, भगतवाडी, घरतवाडी, राजुरी, सोगाव, रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी, उम्रड, मांजरगाव, उंदरगाव आदी 35 गावातील लोक पुणे जिल्ह्यात जवळच्या मार्गाने जाण्यासाठी करत आहेत. 

या ब्रिटिशकालीन पुलाची देखभाल दुरूस्ती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आहे. पुलाचे आयुष्य तब्बल 165 वर्षे झाले आहे. पुलाचे मॅपिंग सपोर्ट कमकुवत बनले असून ठिकठिकाणी पुलाच्या भिंतीस तडे जाऊन झाडे उगवली आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here