सोलापूर,दि.10: Solapur: युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरू असल्याने शिक्षणासाठी गेलेले सोलापूर जिल्ह्यातील 36 विद्यार्थी तिथेच अडकून पडले होते. केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा राबविल्याने जिल्ह्यातील 36 विद्यार्थी आपापल्या घरी सुखरूप पोहोचले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून माहिती घेतली होती. शंभरकर यांनी वेळोवेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्याशी संपर्क केला होता.
36 विद्यार्थ्यांपैकी 34 विद्यार्थी सुखरूप आहेत तर इतर दोन विद्यार्थ्यांचा सध्याचा पत्ता पुणे येथील असल्याने ते तिथेच आहेत. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पुणे यांना कळविण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या घरी संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी 8 मार्च ते 10 मार्चपर्यंत भेट देऊन पाहणी केली आहे.
विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे- पंढरपूर तालुक्यातील विद्यार्थी – बोंगे विश्वास ज्योतिराम, माने प्रथमेश अनिल, वैशाली मधुकर जाधव, प्रसाद शिंदे, कोळी वैष्णव तुकाराम, कलुबर्मे निरंजन दत्तात्रय, मुंडफणे ऋतुज शशिकांत, कदम प्रबोधिनी दत्तात्रय, पाटील वेदांत बाळासाहेब, कदम वैष्णवी दिलीप आणि शिरोळे इशा
बार्शी तालुका – काळे कल्याणी काकासाहेब, यादव दिपक, लोंढे प्रशांत अनंत.उत्तर सोलापूर तालुका- जोशी यश प्रताप, शहापुरे अकिंता अनिल, गेंगणे सलोनी अजयकुमार, शेख अल्फाज नाझ मोहोम्मद शकील अख्तर, बच्चुवार मिहीर जयंत, पाटील साक्षी शिवाजी, दक्षिण सोलापूर तालुका – लझीना असिफ सय्यद. माढा तालुका- पाटील प्रज्ज्वल अशोक, मंगळवेढा तालुका- खटकाळे सुप्रिया सुभाष, चव्हाण अभिजीत काकासो, गवळी रितेश बाजीराव, प्रथमेश कांबळे आणि भोसले प्राजक्ता दादा. करमाळा तालुका- गेंगणे सलोनी अजयकुमार, शिंदे सुमित. माळशिरस तालुका- माने विक्रात वसंत, काबडे रुतुजा बाबासाहेब.सांगोला तालुका- बाबर शार्दूल भागवत, कांरडे सचिन, घाडगे प्राजक्ता शिवाजी,मोहोळ तालुका- सावंत शिवम हरीदास आणि पवार आकाश शशिकांत.
Home सोलापूर वार्ता Solapur: युक्रेनमध्ये अडकलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्व 36 विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले