Solapur Accident | सोलापुरात ट्रक आणि रिक्षाच्या भीषण अपघातात 1 ठार, आठजण जखमी

सोलापुरात (Solapur Accident) झालेल्या अपघातात मिजबा शुकूर मुलाणी या चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे

0

सोलापूर,दि.3: सोलापुरात (Solapur Accident) ट्रक आणि रिक्षाच्या भीषण अपघातात 1 ठार तर आठजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मार्केटयार्ड जवळील शेळगी रस्त्यावर ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात मिजबा शुकूर मुलाणी या चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे तर इतर आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कसा झाला अपघात | Solapur Accident

शुक्रवार असल्याने दुपारी दोनच्या सुमारास शेळगी भागातील कोरबू कुटुंबीय हे मित्र नगरहून शहापुरअली दर्गा येथे जात होते. सर्वजण दर्ग्याला दर्शनासाठी रिक्षातून निघाले होते. परमशेट्टी मिल चौक ते हायवेलगतच्या सर्व्हिस रोडदरम्यान ॲग्रो मिलच्या पाठीमागे रिक्षा येताच सुसाट धावणाऱ्या ट्रक ( MH 43, BP 8788) ने रिक्षा (MH 13, AF 2209) ला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात (Solapur Accident) मिसबा नामक मुलगी जागीच ठार झाली. या भीषण अपघातात कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी झाले.

अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये रिक्षाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. रिक्षा चालकदेखील गंभीर जखमी झाला. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात नातेवाइकांची व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here