सोलापूर,दि.7: Solapur: नगर भूमापन अधिकारी सोलापूर कार्यालयातील भूमापक अशपाक भागनगरी व भूमापक समीर खाटीक यांनी मारहाण केल्यामुळे त्यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये कलम 323, 504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिका विभागीय कार्यालय क्रमांक पाच येथील जमादार म्हणून गेल्या वीस वर्षापासून कार्यरत असलेले सिद्धाराम चन्नप्पा बिराजदार राहणार शेळगी गावठाण यांनी भवानी पेठ येथील त्यांच्या मिळकतीवर वडिलांच्या मयतीनंतर नोंदणीसाठी अर्ज केला होता. (Solapur News)
28 हजार रुपयांची मागणी | Solapur
वारस नोंद होऊन मिळण्यासाठी नगर भूमापन अधिकारी सोलापूर यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. समीर खाटीक यांच्याकडे 1 वर्षापासून नोंद झालेली नाही, सदर वारस प्रकरणात समीर खाटीक यांनी चार वेळा पंचनामा केलेला आहे. त्यांनी एजंट सुनील कांबळे यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे सुनील कांबळे यांना भेटले असता त्यांनी त्यांच्या कामाचा खर्च 30000 आहे, खाटीक साहेबांचे दहा हजार रुपये, किरण कांगणे साहेबांना दहा हजार, आणखी एकांना दहा हजार रुपये त्याप्रमाणे नोव्हेंबर 2022 मध्ये एजन्ट कांबळे यांना तङजोडीअंती 28 हजार रुपये वारस नोंदीसाठी देण्यात आले.
मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल | Solapur News
त्यानंतर 27/1 /2023 रोजी किरण कांगणे यांना समक्ष भेटून तक्रार केली असता, योग्य ती कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे 29/1 /23 रोजी साडेबारा वाजता सदर वारस नोंद प्रकरणात एक तर माझी नोंद घ्या नसेल तर माझे पैसे परत द्या असे बिराजदार म्हणताच, तुझी वारस नोंद घेणार नाही असे म्हणत पोटात लाथा बुक्यानी मारहाण करण्यात आली. यानंतर बिराजदार यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात भागानगरी व समीर खाटीक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारदार बिराजदार यांनी या प्रकरणात शपथपत्र दाखल केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, जमाबंदी आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी पोलीस उपअधिक्षक भूमी व मालमत्ता अभिलेख यांना हे शपथ पत्र सादर केले आहे. ही सर्व घटना घडल्यानंतर नगर भूमापन अधिकारी सोलापूर कार्यालयातील भूमापक समीर खाटीक यांनी सिद्धाराम बिराजदार यांच्यावर सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अनेक तक्रारी जयराज नागणसुरे यांच्याकडे आल्या आहेत
नगर भूमापन कार्यालयातील अशपाक भागनगरी व समीर खाटीक, नगर भूमापन अधिकारी किरण कांगणे यांच्या विरोधात अनेकांचे तक्रारी आहेत. पैसे घेऊन एजंटामार्फत नोंदी घेतले जातात अशा अनेक तक्रारी सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे यांच्याकडे आल्या आहेत. या प्रकरणात जयराज नागणसुरे यांनी बोगस डिक्री करून कोर्टाची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच बोगस बक्षीस पत्र तयार करून बोगस नोंद प्रकरणाचे तक्रारी विभागीय आयुक्त व लोकायुक्त महाराष्ट्र पोलीस आयुक्त सोलापूर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडे, तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.
अस्वीकरण: बातमीतील दाव्याच्या सत्येतेची हमी सोलापूर वार्ता घेत नाही.