सोलापूर,दि.२८: सोलापूर (Solapur) येथील सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी १०८५ ट्रक कांद्याची आवक झाली असून यातून १६ फोटी २८ लाख ६७ हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. सरासरी कांद्याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. आवक वाढूनही दर स्थिर राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
१० जानेवारी रोजी १०५४ ट्रक कांद्याची आवक झाली होती. त्यानंतर दररोज ५०० ते ८०० ट्रक कांद्याची आवक होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक कांद्याची आवक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत आहे. गुरुवारी संपूर्ण बाजार समितीमध्ये कांदाच कांदा दिसत होता. भुसार बाजारातही कांदा उतरविण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. सोलापूर बाजार समितीमध्ये चांगला दर मिळत असल्याचे पाहून सोलापूरसह उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली व विजयपूर, कलबुरगी, बिदर आदी जिल्ह्यातून कांद्याची आवक होत आहे.

येथील कांद्याला प्रामुख्याने दक्षिण भारतातील चेन्नई, बंगलुरू, हैदराबाद, तिस्वअनंतपूरम आदी महानगरांतून मोठी मागणी आहे. आणखी काही दिवस कांद्याची आवक वाढत राहण्याचा अंदाज येथील व्यापाऱ्यांनी वर्तविला, बाजार समितीमधील कांदा विभागाची सध्याची जागा अपुरी पडत असल्याने पर्यायी जागेचा विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यापारी व शेतकन्यांनी व्यक्त केली आहे.
आज बाजार बंद
सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची विक्रमी आवक झाल्याने आज ( शुक्रवारी ) लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांनी दिली. आवक वाढले असलेतरी दर स्थिर असल्याचे ते म्हणाले.