Video: लग्नात जेवणावरूनच झाला राडा, एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या

0

मुंबई,दि.23: लग्नात जेवणावरूनच राडा झाला. एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या फेकण्यात आल्या. सोशल मिडीयावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतात. लग्न म्हटलं की मानापमान, रुसवे-फुगवे हे आलेच. कधी वराकडचे रुसतात, तर कधी वधूकडच्या लोकांनाही एखादी गोष्ट आवडत नाही. पण अशा गोड-आंबट क्षणांना लग्न समारंभ पार पडतो आणि नवदांपत्याला आशिर्वाद देऊन लोक मस्त जेवायला जातात. पण एखाद्या लग्नात जेवणावरूनच राडा झाला तर?

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय जेथे लग्नात जेवणावरून, तेही स्पेशली पनीरवरून मोठा राडा झाला. साध्या मुद्यावरून सुरू झालेला वाद बघता, बघता एवढा पेटला की लग्न मंडपाला युद्ध भूमीचं स्वरूप आलं. तो अक्षरश: कुस्तीचा आखाडाच बनला होता.

एका लग्नातील जेवणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये लग्नासाठी आलेली लोकं एकमेकांवर खुर्च्या फेकताना, मारामारी करताना दिसत आहेत. तर काही लोकांनी एकमेकांची थेट कॉलरच पकडली.

लग्नात पनीरवरून राडा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मटर-पनीरच्या भाजीवरून राडा झाला. वर आणि वधू या दोघांकडचे नातेवाईक एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. मटरपनीरची भाजी मिळाली नाही म्हणून ते एकमेकांवर धावून गेले आणि त्यांच्यातील वाद पेटला. थोड्या वेळाने तर त्यांचं भांडण एवढं टोकाला गेलं की मारहाण सुरू झाली. काहींनी तर एकमेकांवर खुर्च्याच फेकून मारल्या.

पनीर आणि मटरवरून नवरा-नवरीकडचे पै पाहुणे आमनेसामने आले आणि जोरदार हंगामा झाला. जेवणामध्ये पनीर मिळाले नाहीत म्हणून एकमेकांवर धावत जाऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी टोकाला गेली की, खुर्च्या उचलून एकमेकांच्या डोक्यात घालण्यात आल्या.

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र बऱ्याच कमेंट्स केल्या. हा वाद नेमका कशासाठी झाला, हे जाणून घेण्याची लोकांना बरीच उत्सुकता होती. हा व्हिडीओ कोणता आहे, वाद का झाला असे एक नाही असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.पनीरमुळे आता तिसरं महायुद्ध पेटलंय, अशी कमेंट एकाने केली. तर लग्नात पनीर मिळालं नाही म्हणून खुर्च्यांची मोडतोड करून पैसे वसूल करत आहेत, अशी कमेंट दुसऱ्याने केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here