शिक्षकांमुळेच सामाजिक व देशाची प्रगती शक्य: सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक आर्वे

0

सोलापूर दि 11 :- गुरुविद्या प्रतिष्ठानचा गुरूविद्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे समारंभ थाटात वितरण समाज कल्याण केंद्र येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुरूवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करून झाली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अशोक भांझे विस्तार अधिकारी सोलापूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिपक आर्वे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन सोलापूर, गुरुविद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोमशेखर भोगडे, प्रतिष्ठानचे नुतन अध्यक्ष सातलिंग शटगार, उपाध्यक्षा राजश्री तडकासे, रेणुका हब्बू प्रतिष्ठानचे सल्लागार मोहन भूमकर, सदस्य विजयकुमार भोगडे नंदीध्वज मानकरी उपस्थित होती.

प्रास्ताविक प्रतिष्ठानचे उपाध्यक्षा राजश्री तडकासे यांनी केले. पाहुण्याचे ओळख प्रतिष्ठानचे नुतन अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केले. ‘गुरूविद्या आदर्श शिक्षक पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रतिष्ठान मधील शिक्षकांचा सत्कार, विशेष सत्कार राजश्री तडकासे यांना बसवेश्वर विचार मंच वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, सेवानिवृत्त शिक्षक अंबादास गवळी दत्त प्रशाला, चंद्रकांत सपळे, सोमशेखर भोगडे यांचाही सत्कार करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त शिक्षक सत्काराला उत्तर श्री अण्णाराव खंडागळे, कविता पुजारी, शैलेजा स्वामी यांनी दिले. व्यास पीठावरून अशोक भांझे विस्तार अधिकारी यांनी शिक्षकांचे व प्रतिष्ठानचे कौतुक करून शुभेच्छा, अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक आवें यांनी शिक्षकांमुळेच सामाजिक व देशाची प्रगती शक्य आहे असे गौरवोद्गार केले. शिक्षक हा समाजाचा कणा आहे. शिक्षकांना व प्रतिष्ठानचे कौतुक करून अभिनंदन केले.

पुरस्कार प्राप्त शिक्षक राखी देवानंद देशमाने ( मुख्याध्यापिका) श्री चतुराबाई श्राविका प्राथमिक शाळा, सोलापूर, शैलजा श्रीशैल स्वामी (मुख्याध्यापिका) आशश्या अरकाल आंध्रभद्रावती मराठी विद्यालय सोलापूर, अंजली शिरसी (सहशिक्षिका) सेवासदन प्रशाला सोलापूर, कविता औदप्पा पुजारी (सहशिक्षिका) अण्णासाहेब पाटील विद्यालय सोलापूर, प्राध्यापक कल्लप्पा रामचंद्र उस्तुरगे (एस.व्ही.एस.कनिष्ठ महाविद्यालय) भवानी पेठ सोलापूर, अण्णाराव नागनाथ खंडागळे (कलाशिक्षक) माढा, आकाश अनिल मिस्किन (क्रिडाशिक्षक) अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कूल घरकुल सोलापूर यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मुती चिन्ह प्रमाणपत्र, मोत्याचे माळ असे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद लिगाडे, शिवलिला भोगडे, नर्मदा कनकी आणि सर्व सन्माननीय सदस्य प्रयत्न केले.

शेवटी आभार प्रदर्शन श्री मोहन भूमकर यांनी केले तर सुत्र संचालन अरूणा हणंमगाव, राजश्री तडकासे यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here