सोलापूर लोकसभा मतदार संघात ७ वाजेपर्यंत झाले इतके मतदान

0

सोलापूर,दि.७: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघापैकी सोलापूर लोकसभा मतदार संघात सायंकाळी ७ पर्यंतची मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे.

सोलापूर लोकसभा मतदार संघात सायंकाळी ७ पर्यंत ५७.४६ टक्के मतदान झाले आहे. मोहोळ विधानसभामध्ये सर्वाधिक ६०.१६ टक्के मतदान झाले आहे. दक्षिण सोलापूरमध्ये ५८.२१ टक्के मतदान झाले आहे. आमदार प्रणिती शिंदे यांचा मध्य मतदार संघात ५६.३२ टक्के मतदान झाले आहे. भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर मतदार संघात ५६.८१ टक्के झाले आहे.

सोलापूर लोकसभा

सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयाची खात्री देत रामलाल चौक येथे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here