सोलापूर महापालिकेने सुरू केला व्हाट्सअॅप चॅटबॉट !

0

सोलापूर,दि.२२: सोलापूर महापालिकेच्या विविध सेवा, सुविधा आणि इतर माहिती आता नागरिकांना मोबाईलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांना ९११२२२१९०१ हा मोबाईल नंबर सेव्ह करून घ्यावा लागेल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली.

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या विविध सेवा सुविधा ऑनलाईन करण्यात येत आहेत. या अंतर्गतच आता महापालिकेने व्हाट्सअॅप चॅटबॉट सुरू केला आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलवर दिलेला नंबर सेव्ह करून ठेवावा. शहरातील प्रत्येकाला या नंबरवरुन व्हाट्सअपद्वारे आपल्या कामाबद्दलची माहिती मिळवता येईल.

आधी ९११२२२१९०१ हा नंबर सेव्ह करून त्या नंबरवर Hi असा संदेश पाठवावा. पुढे जाण्यासाठी इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडावी लागेल. त्यानंतर नमूद खालील सेवा निवडण्याचे पर्याय आहेत. यामध्ये नागरी सेवा, ऑनलाइन पेमेंट, बुकिंग, तक्रार, घंटागाडी जीपीएस, प्रश्न उत्तर, योजना, माय सोलापूर ॲप, सोशल मीडिया असे पर्याय आहेत. त्यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती आणि नोंदणी करता येईल. नागरी सेवांमध्ये जन्म मृत्यू नोंदी, विवाह नोंदणी , मालमत्ता कर संबंधित, घनकचरा विभाग, विविध व्यवसाय परवाना, नगर रचना विभाग संबंधी असे पर्याय आहेत. आवश्यकते पर्याय निवडून आपली सेवा उपलब्ध करून घेता येणार आहे.

हा स्वयंचलित डिजिटल संगणक प्रोग्राम आहे. याद्वारे महापालिकेच्या विविध डिजिटल सेवा पाहता येणार आहेत.व्हाट्सअप चॅटबॉट म्हणजे व्हाट्सअपवर स्वयंचलितपणे संवाद साधणारा बॉट (यंत्रमानव आधारित प्रोग्राम).हा बॉट वापरकर्त्यांच्या संदेशांना उत्तर देतो, माहिती पुरवतो किंवा ठरावीक सेवा उपलब्ध करून देतो. याचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे स्वयंचलित उत्तर देतो. एखादा ग्राहक “Hi” असा मेसेज पाठवला तर बॉट लगेच उत्तर देतो. या सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here