सोलापूर,दि.4: SMC: सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा वेळेत बदल करण्यात आला आहे. पाणी पुरवठ्या संदर्भात कामे सुरू असल्याने यात बदल करण्यात आल्याचे सोलापूर महानगरपालिकेने (SMC) कळवले आहे. सोलापूर स्मार्ट सिटी योजने अंतर्गत, स्काडा नियंत्रण प्रणालीचे काम प्रगतीपथावर असून, सदर योजनेअंतर्गत उजनी जलवाहिनी, पाकणी जलशुध्दीकरण केंद्र, सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्र, भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्र व टाकळी जलवाहिनी येथे विविध प्रकारचे उपगांची कामे प्रस्थावित आहे.
3 ऐवजी 4 दिवसानंतर होणार पाणीपुरवठा | SMC
सदरची कामे तातडीने पूर्ण होणेकामी वेळोवेळी शटडाऊन राहील. यामुळे सोलापूर शहरातील पाणीपुरवठा दि. 10.02.2023 ते पुढील 25 दिवसापर्यंत 03 ऐवजी 04 दिवसानंतर होणार आहे. तसेच 4 दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कोणतेही बदल होणार नाही. असे महापालिकेने कळवले आहे.
उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन | SMC News
या कालावधीत पाणी पुरवठा चार दिवसआड नंतर देखील उशीरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृपया नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, ही नम्र विनंती असे महापालिकेने कळवले आहे.