Silent Call Scam: फोन आला पण कोणीच बोलत नाही, व्हा सावध

0

सोलापूर,दि.24: Silent Call Scam: फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. गुन्हेगार नवनवीन युक्त्या वापरून लोकांना फसवत आहेत. ‘डिजिटल अरेस्ट’ करून अनेकांना करोडो रूपयांना गंडा घालण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आजकाल अनेक लोकांना असे फोन कॉल येत आहेत, जे तुम्ही उचलल्यावर काहीच आवाज येत नाही. खरंतर बहुतांश लोक काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम असेल म्हणून याकडे दुर्लक्षही करतात. परंतु प्रत्यक्षात हा एकप्रकारचा धोकादायक असा सायलेंट कॉल स्कॅम देखील असू शकतो. कारण, आजकालच्या डिजिटल युगात वाढत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारीचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. सायबर क्राईमच्या विविध घटना तर आपण दररोज पाहत असतो.

या सायलेंट कॉलच्या वाढत्य घटनांच्या पार्श्वभूमीवर, दूरसंचार विभागाने (डेढ) त्यांच्या अधिकृत द अकाउंटद्वारे सायलेंट कॉल्सबाबत जनजागृती करण्यासाठी एक इशारा देखील जारी केला आहे. दूरसंचार विभागाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये स्पष्ट केले आहे की सायलेंट कॉल ही केवळ नेटवर्क सम स्या नाही तर सायबर गुन्हेगारांकडून वापरली जाणारी एक नवीन युक्ती असू शकते. 

अशा कॉलद्वारे युजर्सना मोठ्या फसवणुकीसाठी लक्ष्य केले जात आहे. त्यामुळेन दूरसंचार विभागाने मोबाइल वापरकर्त्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे आणि स्पष्ट केले आहे की तुमचा जरासा निष्काळजीपणा देखील तुमचे मोठे नुकसान करू शकतो.

स्कॅमर ‘सायलेंट कॉल’चा वापर का करतात ? | Silent Call Scam

सायबर गुन्हेगार सायलेंट कॉलचा वापर’ करून अनेक गोष्टी लक्षात घेतात, जसे की युजर किती लवकर कॉलला उत्तर देतो. कॉल बंद होण्यास किती वेळ लागतो. कॉल उत्तर दिल्यानंतर वापरकर्त्याची पार्श्वभूमी काय आहे. या माहितीच्या आधारे ते युजरला फसवणुकीसाठी सोपे लक्ष्य म्हणून लक्षात ठेवतात. त्यानंतर, त्याच नंबरवर विविध स्कॅम कॉल किंवा संदेश येऊ लागतात. 

‘सायलेंट कॉल’ला कॉल बॅक केल्यास काय धोके आहेत ? 

सायलेंट कॉलनंतर, फोन वापरकर्त्यास असे संदेश किंवा फोन येऊ शकतात, जसे की तुमचे बँक खाते ब्लॉक केले गेले आहे. तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक होणार आहे. तुम्ही तुमचे केवायसी अपडेट न केल्यास तुमचे सिम निष्क्रय केले जाईल. 

हे कॉल अनेकदा बँक अधिकारी, सरकारी कर्मचारी किंवा ग्राहक सेवा अधिकारी असल्याचे भासवून स्कॅमर करतात, ज्यामुळे लोक त्यांच्या शब्दांत अडकतात आणि फसवणुकीचे बळी बनवतात. 

सायलेंट कॉलचा बळी होणं कसं टाळायचं ? 

दूरसंचार विभागाने वापरकर्त्यांना काही महत्त्वाच्या खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. जसे की, कोणत्याही सायलेंट कॉलला कॉल बॅक कधीही करू नका. अज्ञात नंबरवरून येणारे कोणतेही सायलेंट कॉल हलक्यात घेऊ नका. अशा नंबरची त्वरित संचार साथी अॅप किंवा वेबसाइटवर तक्रार करा. तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका. तुमचा ओटीपी, पिन किंवा बँक तपशील कोणाशीही शेअर करू नका.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here